-
गेल्या बारा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. यातील कलाकार त्यांच्या भूमिकांच्या नावानेच ओळखले जातात. अशीच एक कलाकार म्हणजे मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मेस्त्री
-
रोशन सोढीची पत्नी मिसेस सोढी ही भूमिका साकारून जेनिफर घराघरात पोहोचली.
-
जेनिफर मालिकेच्या सुरुवातीपासून त्यात काम करतेय. मात्र मध्यंतरी २०१३ मध्ये तिने मालिका सोडली होती.
-
नंतर २०१६ मध्ये मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी जेनिफरला मालिकेत पुन्हा आणलं.
-
जेनिफरने एअरलिफ्ट आणि हल्लाबोल यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.
-
जेनिफर ही मूळची मध्यप्रदेशमधल्या जबलपूर इथली आहे. तिचा जन्म एका पारसी कुटुंबात झाला.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम