आजच्या तरुणाईमध्ये ‘मोह-मोह के धागे’, ‘सवार लूँ’, ‘जरा जरा टच मी’ या गाण्यांची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. (सौजन्य : सर्व फोटो मोनाली ठाकूर इन्स्टाग्राम) या लोकप्रिय गाण्यांना ज्या गायिकेचा स्वरसाज लाभला ती गायिका म्हणजे मोनाली ठाकूर आपल्या सुरांनी आणि गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मोनालीचा आज वाढदिवस. छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल 2’ या रिअॅलिटी शोमध्ये मोनाली पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर गोड आवाजामुळे तिला कलाविश्वात पदार्पण करण्याची संधी मिळाली. सध्या मोनाली चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय असून तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेण्यास चाहते कायमच उत्सुक असतात. मोनालीच्या करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, तिच्या पर्सनल लाइफविषयी आणि पतीविषयी फार कमी जणांना माहित आहे. मोनालीने २०१७ मध्ये लग्न केल्याचं म्हटलं जातं. मोनालीचे पती कलाविश्वाशी निगडीत नसून ते एक व्यावसायिक आहेत. Maik Richter असं मोनालीच्या पतीचं नाव आहे. स्वित्झर्लंडस्थित Maik Richter हे एका मोठ्या रेस्टॉरंटचे मालक आहे. मोनाली बऱ्याच वेळा सोशल मीडियावर तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. तरुणाईमध्ये मोनालीची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे तिच्या स्टेज शोवेळी तरुणाईची अफाट गर्दी पाहायला मिळते. मोनालीने केवळ बॉलिवूडच नव्हे तर बंगाली चित्रपटांसाठीदेखील पार्श्वगायन केलं आहे. मोनाली केवळ एक उत्तम गायिकाच नसून ती नृत्यांगना आणि अभिनेत्रीदेखील आहे. मोनालीने नागेश कुकुनूर यांच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात काम केलं आहे.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल