-
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे जास्त चर्चेत असते.
-
श्वेता तिवारीच्या घरातील भांडणं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत.
श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहली याने पत्नी आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे. (Photo: Instagram) इतकंच नाही तर अभिनवने श्वेताच्या घराबाहेर उभे असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo: Instagram) व्हिडीओमध्ये अभिनव कोहली वारंवार घराची बेल वाजवत असून आपल्याला घरात प्रवेश मिळावा यासाठी आरडाओरड करत आहे. इतकंच नाही तर अनेकदा दरवाजाही ठोठावत आहे. अभिनव कोहलीने इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला असून 'Torture' अशी कॅप्शन दिली आहे. (Photo: Instagram) "प्यारु….दरवाजा उघड…मला प्यारुला भेटू दे…हे सगळं का करत आहेस?," अशी विचारणा अभिनव कोहली उत्तर मिळत नसल्याने करताना दिसत आहे. (Photo: Instagram) "हे सर्व असं आहे…तुम्ही एका व्यक्तीला इतका त्रास द्या की तो असहाय्य झाला पाहिजे आणि चुकीचं काम करेल," असंही अभिनव कोहली सांगतोय. (Photo: Instagram) अभिनवने सांगितलं आहे त्यानुसार, श्वेता याआधी त्याला मुलगा रेयांशला भेटू देत होती. पण ते लहान मुलं प्रचंड घाबरलं आहे. पत्नी आणि आपल्यामध्ये होणाऱ्या भांडणाचा मुलाच्या मनावर होणाऱ्या परिणामाबद्दलही अभिनव कोहली सांगत आहे. (Photo: Instagram) "बिचारा आतमध्येच असेल…श्वेता घराबाहेर गेली असेल तर तिने मुलाला खोलीत बंद केलं असेल. हीच सत्य परिस्थिती आहे," असं अभिनव कोहली सांगत आहे. (Photo: Instagram) घरात श्वेताची आई, मुलगी पलक आणि तीन नोकर राहत असतानाही कोणी उत्तर देत नसल्याचं अभिवनचं म्हणणं आहे. (Photo: Instagram) -
दरम्यान अभिनवने अजून एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्याने श्वेताला पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने तू मला त्रास का देत आहेस? अशी विचारणा केली आहे.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात श्वेता तिवारीने अभिनव कोहलीविरोधीत कौटुंबिक हिसाचाराची तक्रार केली होती. (Photo: Instagram) -
श्वेताचं हे दुसरं लग्न असून अभिनेता राजा चौधरीसोबत पहिलं लग्न झालं होतं.
-
पहिल्या पतीपासून श्वेताला एक मुलगी आहे. नऊ महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघं वेगळे झाले होते.
-
अभिनवपासून वेगळं झाल्यानंतर श्वेताने आपलं लग्न म्हणजे विषारी संसर्ग होता असं म्हटलं होतं. आपण तो संसर्ग नष्ट केला असून आता पुन्हा एकदा निरोगी झाल्याचं तिने सांगितलं होतं.
-
दरम्यान अरमान कोहलीला ऑगस्ट महिन्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
-
याशिवाय अभिनवने मुलगी पलकवर हात उचलल्याचाही आरोप श्वेताकडून करण्यात आला होता.
-
अभिनव कोहलीने आपल्यापासून सुटका करुन घेण्यासाठी श्वेताने मुलीचा वापर केल्याचं म्हटलं होतं.
-
अभिनव मुलीसोबत आक्षेपार्ह भाषेत बोलायचा तसंच लैंगिक शोषण केल्याचा ही आरोप झाला होता.
-
श्वेता तिवारी बिग बॉसमध्ये होती तेव्हा आपणच पलकचा सांभाळ करत होतो. श्वेताला तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकायचं होतं. पण मी तिला थांबवलं असंही अभिनवचं म्हणणं होतं.
-
आपण मुलीप्रमाणे पलकला वाढवलं असल्याचं अभिनवचं म्हणणं आहे.

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”