-
Bihar Election 2020 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बॉलिवूडचा तडका हा लागलाच होता. निरनिराळ्या पक्षांसाठी बॉलिवूडच्या कलाकांरी प्रचारही केला. अभिनेत्री नेहा शर्मानं आपले वडील अजित शर्मा यांच्यासाठी प्रचार केला. या निवडणुकीत काही सक्रिय नेते एकतर अभिनेत्यांची मुलं आहेत किंवा त्यांची मुलं बॉलिवूडमध्ये आहेत.
-
नेहा शर्मा ही बिहारच्या भागलपुरमधचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची कन्या आहे. अजिक शर्मा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले होता. नेहा शर्मा बॉलिवूडमध्ये तितका प्रभाव टाकू शकली नाही.
-
आयशा शर्मा हीदेशील एक अभिनेत्री आहे. ती नेहा शर्मा हिची लहान बहिण आहे. तीदेखील बॉलिवूडमध्ये आपली ओळख अद्याप निर्माण करू शकली नाही.
-
लव सिन्हा शत्रुघ्न सिन्हा यांचा सुपुत्र आहे. शत्रुघ्न सिन्हा बिहारमधील पाटणा साहिब येथून खासदार म्हणून निवडून गेले आहे. त्यांनी केंद्रात मंत्रिपदही भूषवलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याचं बॉलिवूडमधील करिअरही फ्लॉप राहिलं आहे.
-
बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर लव सिन्हा राजकारणात उतरले आहेत. त्यांनी बांकीपुर विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे.
-
चिराग पासवान आज बिहारच्या राजकारणातील चर्चेतलं नाव आहे. त्यांचे वडील लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान अनेक वर्ष केंद्रात मंत्रीही होती. चिराग पासवान यांनी राजकारणात येण्यापूर्वी बॉलिवूडध्येही आपली नशीब आजमावलं होतं. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्यांनी अभिनय सोडला आणि राजकारणात प्रवेश केला.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल