-
Descendants of the sun- सैन्यात काम करणारा युवक आणि डॉक्टर म्हणून काम करणारी युवती यांच्यातील प्रेमकहाणी व त्यात येणारे अडथळे यावर वेब सीरिजची कथा आधारित आहे.
-
Inheritors- हाय प्रोफाइल कुटुंबातील विविध नात्यांत असणारे वाद, त्याच कुटुंबात जन्मलेला पण आपली ओळख लपवणाऱ्या तरुणाचा व एका अत्यंत गरीब कुटुंबातील तरुणी यांची ही कहाणी आहे.
-
cinderella and four knights- अत्यंत श्रीमंत कुटुंबातील तीन भावंडांना एकत्र आणण्यासाठी एक गरीब होतकरू मुलगी काय आणि कसे प्रयत्न करते यावर सीरिजची कथा आधारित आहे.
-
Crash landing on you- साऊथ कोरियात राहणारी तरुणी चुकून एकेदिवशी अचानक नॉर्थ कोरियात येऊन पोहोचते. आपल्या देशात जाण्यासाठी तिची धडपड आणि तिथूनच सुरु झालेली प्रेमकथा यात दाखवण्यात आली आहे.
-
My love from the star- पृथ्वीवरील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्री एका एलियनच्या प्रेमात पडली तर काय होईल? तीच कहाणी या सीरिजमध्ये रेखाटण्यात आली आहे.
-
Record of youth- अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी धडपडणारे दोन मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट या तिघांची ही कथा आहे. या तिघांच्या प्रेमाचा त्रिकोण सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.
-
She was pretty- सुंदरता म्हणजे काय आणि सौंदर्याची नवी परिभाषा मांडणारी ही वेब सीरिज आहे.
-
Legend of the blue sea- जलपरी खरंच अस्तित्त्वात असतात का? असल्यास त्यातीलच एक जलपरी सामान्य माणसांसोबत राहू लागली तर काय होईल, याची रंजक कथा या सीरिजमध्ये दाखवली आहे.
-
What's wrong with secretary kim- नियमांचं काटेकोर पालन करणारा पण उद्धट आणि स्वत:च्याच प्रेमात असणाऱ्या बॉसची सेक्रेटरी किम हिची ही कथा आहे. अनेक वर्षांपासून एकाच कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करणारी किम अचानक एके दिवशी नोकरी सोडण्याचा निर्णय घेते तेव्हा काय होतं, याची ही कथा आहे.
-
The world of the married – पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळताच सर्व प्रॉपर्टीसह घटस्फोट आणि मुलाचा ताबा मिळवण्यासाठी एक आई काय काय करते, त्यात कोणत्या अडचणी येतात, नाती जपण्यासाठी माणूस कोणत्या थरापर्यंत पोहोचू शकतो, या सर्वांची कथा यात रेखाटण्यात आली आहे. या सीरिजचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकाला गुंतवून ठेवतो.
-
Strong girl bong soon- जन्मत:च प्रचंड ताकदवान असलेल्या बोंग-सूची ही कथा आहे. तिची ताकद तिला कशाप्रकारे अडचणीत आणते आणि त्या ताकदीच्या आधारे ती गुंडांना कसा धडा शिकवते, हे त्यात दाखवण्यात आलं आहे.
-
Her private life – चित्रांचं प्रदर्शन भरवणाऱ्या कंपनीत काम करणारी एक तरुणी इतरांपासून लपून स्वत:चा छंद जोपासत असते. एका प्रसिद्ध मॉडेल व गायकाची ती चाहती असते आणि त्याची फॅनगर्ल म्हणून ती सोशल मीडियावर अकाऊंट काढते. तिचं सत्य जेव्हा तिच्या प्रियकराला व कुटुंबीयांना समजतं, तेव्हा काय होतं याची उत्कंठावर्धक कथा यात पाहायला मिळते.
-
Her private life – चित्रांचं प्रदर्शन भरवणाऱ्या कंपनीत काम करणारी एक तरुणी इतरांपासून लपून स्वत:चा छंद जोपासत असते. एका प्रसिद्ध मॉडेल व गायकाची ती चाहती असते आणि त्याची फॅनगर्ल म्हणून ती सोशल मीडियावर अकाऊंट काढते. तिचं सत्य जेव्हा तिच्या प्रियकराला व कुटुंबीयांना समजतं, तेव्हा काय होतं याची उत्कंठावर्धक कथा यात पाहायला मिळते.
-
Romance is bonus book- एकदा गमावलेलं प्रेम अनेक वर्षांनंतर पुन्हा समोर आलं असेल आणि पुन्हा एकदा नव्याने तुम्ही प्रेमात पडलात तर काय होईल, याची कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
-
I am not a robot- पैशांसाठी रोबोट बनून एक तरुणी एका श्रीमंत मुलाच्या घरी काम करू लागते. मात्र त्या मुलाला जेव्हा तिचं खरं रुप समजतं, तेव्हा काय होतं, याची कथा सीरिजमध्ये पाहायला मिळेल.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल