भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी मुंबईत राहायला येणार आहे. याबाबतचा इशारा धोनीची पत्नी साक्षी हिने दिला आहे. साक्षीने सोशल मीडियावर त्यांच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. साक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर हे फोटो पोस्ट करत लिहिलं, 'नवीन घर'. धोनीचं हे निर्माणाधीन घर मुंबईत आहे. धोनी त्यांच्या कुटुंबासह मुंबईत राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर धोनी एंटरटेन्मेंट या नावाने एक नवीन प्रॉडक्शन कंपनीसुद्धा तो सुरू करणार आहे. या कंपनीची व्यवस्थापकीय संचालक साक्षी असेल. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघातर्फे त्याने सामने खेळले. धोनीला चेन्नई सुपरकिंग्जकडून दरवर्षी मानधन म्हणून १५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय जाहिरातींमधूनही त्याची तगडी कमाई होते. निवृत्त झाल्यानंतरही धोनीची ब्रँड व्हॅल्यू जराही कमी झाली नाही. -
लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये राहत होता. याच फार्म हाऊसमध्ये धोनी आता कडकनाथ कोंबड्या पाळणार असल्याचं कळतंय.
-
मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून धोनीने आपल्या रांची येथील फार्म हाऊससाठी २ हजार कोंबड्यांची ऑर्डर दिल्याचं कळतंय.

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!