-
अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अमृता अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
-
यावेळी तिने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वत:चे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
अमृताने २००४ साली इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज या रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
त्यानंतर अदा आणि टाईम बॉम्ब या मालिकांमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.
-
त्याचं दरम्यान २००६ साली तिने गोलमाल या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
पुढे 'नटरंग', 'साडे माडे तीन', 'फुंक', 'राझी', 'मलंग' यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं.
-
जवळपास गेली १५ वर्ष ती अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर देखील आहे.
-
झलक दिखलाजा आणि नच बलिये या डान्स शोमध्ये तिने विजेता पद पटकावलं होतं.
-
शिवाय अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिने धमाकेदार डान्स परफॉरमन्स दिला आहे.
-
२ मॅड आणि सुपर डान्सर महाराष्ट्रा या डान्स शोमध्ये तिने परिक्षकाचंही काम केलं आहे.
-
२ मॅड आणि सुपर डान्सर महाराष्ट्रा या डान्स शोमध्ये तिने परिक्षकाचंही काम केलं आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग