क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचे असंख्य चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे होतात. प्रसिद्धीच्या बाबतीत त्याची पत्नी साक्षीसुद्धा काही कमी नाही. सोशल मीडियावर साक्षीचा मोठा फॅनफॉलोईंग आहे. साक्षीने सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाआधी साक्षी कशी दिसायची ते पाहुयात.. साक्षीचे वडील राजेंद्र सिंह रावत हे कोलकाताच्या टी कंपनीत ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांचं शिक्षण एकाच शाळेत झालं. पण तेव्हा हे दोघं एकमेकांना ओळखायचेसुद्धा नाही. साक्षी आणि धोनीची पहिली भेट २००८ मध्ये कोलकाताच्या ताज हॉटेलमध्ये झाली. तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर साक्षीची तिथे ट्रेनिंग सुरु होती. तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि दोन वर्षांनंतर ४ जुलै २०१० रोजी दोघांनी लग्न केलं. साक्षी आणि धोनीच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. या दोघांना झिवा ही मुलगी आहे. सोशल मीडियावर झिवाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया आणि साक्षी धोनी इन्स्टाग्राम

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”