-
महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्यावर टिप्पणी केली. त्यावरुन महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर वाद सुरू आहे. (सर्व फोटो सौजन्य – आरोह वेलणकर इन्स्टाग्राम )
-
“एकीकडे स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि दुसरीकडे ही कसली भाषा? तुमची टीका वाचून लाज वाटली" असे आरोहने म्हटले आहे.
-
"तुमच्या मराठी तारका या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू”, असं आरोहने फेसबुकवर लिहिलं. थेट महेश टिळेकरांशी वाद घालणारा हा आरोह वेलणकर कोण आहे ? ते जाणून घेऊया.
-
प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं.
-
या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली.
-
सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत आरोह वेलणकर डॉ. सौरभ ही व्यक्तीरेखा साकारत आहे. स्मिता तांबे, मिताली मयेकर यांच्या सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत.
-
आरोहने रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्ये काम केलं. तो नाटकात मुख्य भूमिकेत होता.
-
मागच्यावर्षी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात तो दिसला होता. आरोहने वाईल्ड कार्डच्या माध्यमातून घरात प्रवेश केला होता.
-
“मला बिग बॉस हा शो खूप आवडतो. त्यामुळे जेव्हा बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी आली तेव्हा मी लगेच ती स्विकारली. आम्ही कलाकार म्हणून जेव्हा काम करतो. तेव्हा माणूस म्हणून कसे आहोत, हे चाहत्यांना माहित नसते. बिग बॉस हा एकुलता एक शो आहे, ज्यामुळे माणूस म्हणून आम्ही कसे आहोत, हे २४ तास कॅमे-यासमोर राहून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. कारण इथे जसं दिसतं तसंच असतं,” असं आरोहने सांगितलं होतं.
-
आरोह आपल्या फिटनेसबाबतही जागरुक आहे. मध्यंतरी त्याने पिळदार शरीरयष्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
-
आरोह वेलणकर मूळचा पुण्याचा असून त्याच्या कुटुंबाची औद्योगिक पार्श्वभूमी आहे. आरोह व्यवसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला असला तरी त्याला मात्र अभिनयाची आवड आहे.
-
मैत्रीण अंकिता शिंगवी हिच्यासह लग्न करुन त्याने संसार थाटला. डिसेंबर २०१७ मध्ये त्याचे अंकितासोबत लग्न झाले.
-
आरोह वेलणकरला सामाजिक जाणीव देखील तितकीच आहे. मागच्यावर्षी महाराष्ट्रात पूर आला होता.
-
त्यावेळी आरोहने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदतनिधीला एक लाख रुपयांचा मदतनिधी दिला होता.
-
'लाडाची मी लेक गं' या मालिकेत आरोह वेलणकर सध्या डॉ. सौरभ ही व्यक्तीरेखा साकारत आहे. जबाबदार आणि काळजी घेणाऱ्या डॉक्टरची ही व्यक्तीरेखा सध्या प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”