-
अभिनेत्री मालवी मल्होत्राला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वी मालवीवर वर्सोवा परिसरात एका व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. हा हल्ला योगेश महिपाल सिंह मार्फत करण्यात आला होता असा आरोप मालवीने केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या व्यक्तीनं तिला आता जीवे मारण्याची धमकी दिली आहे असा दावा तिने केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मालवी १८ नोव्हेंबर रोजी आपल्या इमारतीच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यावेळी एक मास्क घातलेला व्यक्ती तिच्याजवळ आला अन् त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो व्यक्ती अभिनेत्रीच्या वडिलांवर देखील जोरदार ओरडला अन् योगेश तुरुंगातून सुटताच सूड घेईल अशी धमकी देऊन पळून गेला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो बाईकवर असल्यामुळे त्याला पकडता आलं नाही. असा दावा मालवीने केला आहे. याबाबत तिने पोलिसांनाही माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
योगेश महिपाल सिंह सध्या तुरुंगात आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जानेवारी महिन्यात कामानिमित्त योगेश आणि मालवीची भेट झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर एका तामिळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उटीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली. तिसऱ्या भेटीदरम्यान योगेशने अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली. पण तिने त्याला नकार दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मिळालेल्या नकारामुळे योगेश संतापला अन् त्याने मालवीवर हल्ला केला. त्याने तिच्या पोटावर आणि हातावर चाकूने वार केले. असा आरोप मालवीने केला आहे. दरम्यान मालवीने केलेल्या या नव्या आरोपांची चौकशी पोलिसांद्वारे केली जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”