-
झी मराठीवर गाजलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ स्पर्धेची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड हिचा नुकताच व्यावसायिक रोनित पिसे याच्याशी जंगी विवाहसोहळा पार पडला.
-
कार्तिकी-रोनितच्या लग्नसोहळ्याला संगीत विश्वातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
-
कार्तिकीच्या लग्नासाठी 'लिटल चॅम्प्स'मधील तिची जवळची मैत्रीण आर्या आंबेकरही उपस्थित होती.
-
कार्तिकीच्या लग्न सोहळ्यामध्ये आर्याचं अप्रितम हास्य आणि तिची खास साडी हा खूपच चर्चेचा विषय ठरताना दिसला.
-
आर्याने नेसलेल्या साडीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
आर्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निळ्या रंगाची साडी परिधान केलेला सुंदर फोटो पोस्ट केला.
-
या साडीतील तिचा फोटो साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला.
-
कार्तिकीच्या लग्नातदेखील आर्याच्या साडीचीच अधिक चर्चा असल्याचं समजलं.
-
आर्याने कार्तिकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात फोटोंमध्येदेखील आर्याच्या साडीबाबत चांगल्या कमेंट्स दिसत आहेत.
-
आर्याच्या साडीतील फ्रेश लूकला लाखांच्याही वर फॉलोअर्सने लाईक केलं असून 'अप्रतिम', ' सुंदर', अशा कमेंट्सही केल्या आहेत.
-
साडीतील लूकचे कौतुक पाहायला मिळतंय असं कॅप्शन देत तिने काही नवे फोटोही पोस्ट केले.
-
आर्याने चेन्नई सिल्क साडी परिधान केल्याचं तिने हॅशटॅगमधून सांगितलं. तसेच साडीबद्दल तिला प्रचंड प्रेम असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
-
आर्याचे निळ्या साडीतील अप्रतिम फोटो तिच्या वडिलांनी आणि snapstories_mayurparakh यांनी क्लिक केल्याचे तिने कॅप्शनमध्ये सांगितलं.
-
कार्तिकीच्या लग्नातील आर्याचा हा खास लूक सध्या प्रचंड चर्चेत असल्याचं दिसतंय.
-
सर्व फोटो सौजन्य – आर्या आंबेकर इन्स्टाग्राम

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”