-
शमा सिकंदर ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'शूsssss कोई है' या हॉरर मालिकेमुळे ती रातोरात लोकप्रिय झाली होती. परंतु तिचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. जवळपास पाच वर्ष स्ट्रगल केल्यानंतर तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु ऑडिशन्समध्ये सातत्याने मिळणाऱ्या नकारांमुळे वैतागलेल्या शमानं नैराश्येत जाऊन थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शमानं आपल्या नैराश्येवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शमानं १९९८ साली प्रेम आंगन या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिनं 'मन', 'अंश', 'धुमधडाका', यांसारख्या चित्रपटांमधून लहानमोठ्या भूमिका साकारल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु तिला अपेक्षित असलेली भूमिका साकारण्याची संधी मिळत नव्हती. परिणामी १९९७ पासून २००३ पर्यंत ती बेरोजगार होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक ठिकाणी ऑडिशन्स देऊन सुद्धा तिला काम मिळत नव्हतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान सातत्याने मिळणाऱ्या नकारांमुळे ती नैराश्येत गेली अन् तिने चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एका रात्री तिने आपल्या भावाला आपल्या बँक अकउंटचे पासवर्ड सांगितले. आणि झोपायला गेली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून भावाला संशय आला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो आईसोबत तिच्या खोलीत गेला त्यावेळी तिच्या हातात झोपेच्या गोळ्यांची बाटली दिसली. हा प्रकार पाहून आई संतापली अन् तिने ती बाटली फोडून टाकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पुढे कुटुंबियांच्या मदतीनं ती नैराश्येतून बाहेर पडली. पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न केले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
खरं तरी तिला चित्रपटांमधील एक सुपरस्टार अभिनेत्री व्हायचं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हे स्वप्न तिचं पूर्ण झालं नाही. पण तिला छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये मात्र चांगलीच लोकप्रियता मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आज ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग