जवळपास गेल्या १२-१३ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. मालिकेत जेठालाल आणि त्याची पत्नी दया यांचा विशेष चाहतावर्ग आहे. पण जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीची रिअल लाइफ पत्नी कोण आहे हे माहितीये का? दिलीप जोशी २००८ पासून या मालिकेत काम करत आहेत. मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून ते आतापर्यंत ते सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या रिअल- लाइफ पत्नीचं नाव जयमाला आहे. जयमाला या गृहिणी असून त्या पती व दोन मुलांची जबाबदारी सांभाळतात. दिलीप जोशी आणि जयमाला यांच्या मुलाचं नावं ऋत्विक तर मुलीचं नाव नियती आहे. जयमाला यांना प्रसिद्धीपासून दूर राहणंच आवडतं. त्यांनी काही वेळा दिलीप जोशी यांच्यासोबत पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला