-
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. तशी अनन्या ही चित्रपटांमध्ये काम करण्याआधीपासूनच सोशल मीडियावर चर्चेत होती. मात्र आता अनन्याप्रमाणे पांडे कुटुंबातील अजून एक नाव सोशल मीडियामुळे कायम चर्चेत असतं आणि ते नाव आहे, अलाना पांडे.
-
अलाना पांडे ही अभिनेता चंकी पांडेची पुतणी आहे.
-
अलानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्याचबद्दल आपण या फोटोगॅलरीतून जाणून घेणार आहोत.
-
अलानाची लोकप्रियता इतकी आहे की तुम्ही नुसतं गुगलवर Alanna Panday असं सर्च केलं तरी तिची ओळख इंटरनेट सेलिब्रिटी अशी दाखवली जाते.
-
अलाना ही तिच्या बोल्ड फोटोंसाठी सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
अलानाचे काही बोल्ड फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
-
अलाना सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रचंड अॅक्टीव्ह असून ती आपल्या इन्स्ताग्राम अकाउंटवरुन वेगवेगळे फोटो शेअर करताना दिसते.
-
अलानाने नुकताच एक बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला असून त्याला हजारोच्या संख्येने लाइक्स मिळालेत.
-
आपल्या याच बोल्ड फोटोंमुळे अलाना सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
-
अलानाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
-
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अलाना सध्या लंडनमध्ये राहते.
-
अलाना आता फॅशन डिझायनिंगसंदर्भातील पदवीचे शिक्षण घेत आहे.
-
अलाना लंडन कॉलेज ऑफ फॅशनमध्ये पदवीचे शिक्षण घेतेय.
-
अलाना ही २५ वर्षांची आहे. तिचा वाढदिवस १६ ऑगस्टला असतो.
-
अलानाचा जन्म मुंबईमध्येच झाला आहे.
-
आयवर मॅक्री व्ही हा अलानाचा प्रियकर आहे.
-
अनेकदा अलाना त्याच्यासोबतचे फोटोही आपल्या इन्स्ताग्रामवरुन पोस्ट करत असते.
-
अलानाने आयवरसोबत पोस्ट केलेले काही फोटो खरोखरच खूपच बोल्ड आहेत अशा शब्दांमध्ये चाहते कमेंट सेक्शनमधून व्यक्त होताना दिसतात.
-
मात्र अलानाला टीकेचा आणि ट्रोलिंगचा फारसा फरक पडत नाही हे तिच्या इन्स्ता अकाउंटवरुनच दिसून येतं.
-
अनेकदा तिच्या फोटोंवर वाईट कमेंट्स वगैरे येतात तरी ती त्याकडे साफ दूर्लक्ष करताना दिसते.
-
अलानाला भटकायला आणि डान्स करायला अलानाला खूप आवडतं.
-
थायलंड हे अलानाचे आवडते फॉरेन डेस्टीनेशन आहे.
-
अनेकदा ती सुट्ट्यांमध्ये आपल्या प्रियकरासोबत फिरायला जाते.
-
भटकतींचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तिच्या अकाऊंटवर पाहायला मिळतील.
-
अलानाचे इन्स्ताग्राम अकाऊंट पाहता ती नक्कीच मॉडेलिंगमध्ये करियर करेल असं अनेक चाहते कमेंटमधून सांगत असतात.
-
अलाना ही इन्स्ताग्राम सेलिब्रिटी आहे.
-
त्याचप्रमाणे फॅशन इन्फ्युएन्सर म्हणजेच तरुणांवर प्रभाव पाडणारं व्यक्तीमत्व आणि मॉडेल म्हणूनही अलानाने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.
-
अनेकदा अलाना रेट्रो लूकमधील हटके फोटोही पोस्ट करत असते.
-
अलानाची आई डिने पांडे या सुद्धा मनोरंजन सृष्टीमध्ये लोकप्रिय आहेत. त्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर असून अभिनेत्री बिपाशा बासूच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे.
-
अलानाच्या वडीलांचे नाव चिकी पांडे असून ते प्रसिद्ध उद्योजक आहेत.
-
भारत सरकारच्या स्टील मंत्रालयामधील सदस्य म्हणूनही अलानाचे वडील चिकी पांडे यांनी काम केल्याचं समजते.
-
अलाना आणि शाहरुखची मुलगी सुहाना या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याचे सांगितले जाते.
-
आता आपल्या चुलत बहिणीप्रमाणे अलानाही चित्रपट सृष्टीकडे वळणार का नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
-
मात्र त्यापूर्वीच ती अनन्याप्रमाणे सोशल नेटवर्किंगवर प्रचंड लोकप्रिय झाली आहे हे तिच्या फॉलोअर्सची संख्या पाहूनच समजते.
-
इन्स्ताग्रामवर अलनाचे सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
अलना या अकाऊंटवरुन सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि वेगवेगळे फोटो शेअर करताना दिसते. (सर्व फोटो instagram/alannapanday वरुन साभार)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल