-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य कधी काळी आपल्या लठ्ठपणामुळे चर्चेत होते. पण आता त्यांनी आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करुन सर्वांनाच धक्का दिला आहे. गणेश आचार्यनी आपले वजन ९८ किलोंनी कमी केले आहे. आता ते भरपूर फिट आणि स्लीम दिसतात.
-
अलीकडेच गणेश आचार्य कपिल शर्माच्या शो मध्ये आले होते. याच कार्यक्रमात त्यांनी वजन ९८ किलोनी कमी केल्याचे सांगितले.
-
एकवेळ गणेश आचार्य यांचे वजन २०० किलो झाले होते. इतके वजन असूनही गणेश आचार्य सुंदर नृत्य करायचे.
-
बॉलिवूडमधल्या अनेक मोठया स्टार्ससाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. गोविंदाच्या जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी कोरियोग्राफी केली आहे.
-
वजन कमी करण्यासाठी मी स्ट्रीक्ट डाएट फॉलो केल्याचे गणेश आचार्य यांनी सांगितले.
-
गणेश आचार्य तासन तास जीममध्ये घाम गाळायचे. त्यांची ही मेहनत आता दिसत असून ते फीट आणि स्लीम झाले आहेत.
-
गणेश आचार्य प्रतिभावंत नृत्य दिग्दर्शक आहेत. एककाळ त्यांनी गाजवला होता. (सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल