जबरदस्त अॅक्शन सीन आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. जिस्म या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारा हा अभिनेता आज लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.( सौजन्य : जनसत्ता) आज जॉनचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जॉनविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतूर असतात. त्यामुळेच आपल्या या आवडत्या कलाकाराची लाइफस्टाइल कशी असेल, त्याचं घर कसं असेल असा प्रश्न कायमच चाहत्यांना सतावत असेल. त्यामुळेच जॉनने त्याचं घर नेमकं कसं सजवलंय ते पाहुयात. जॉनने प्रिया रुंचालसोबत लव्ह मॅरेज केलं असून तो मुंबईत एका आलिशान घरात राहतो. जॉनचं घर मुंबईतील बांद्रा येथे बँडस्टँडला आहे. जॉनच्या या प्रशस्त घराचं नाव विला इन द स्काय असं आहे. जवळपास ५ हजार स्क्वेअर फिट परिसरात पसरलेला हा व्हिला डोळे दिपवणारा आहे. (Abraham John Architects / Photographs © Alan Abraham) दोन ड्युप्लेक्स एकत्र करुन जॉनच्या स्वप्नांचं घरं तयार करण्यात आलं आहे. या घराचं इंटेरिअर जॉनचा भाऊ एलन याच्या कंपनीने केलं आहे. या घराची रचना पाश्चात्य पद्धतीने केली असून प्रत्येक लहान लहान गरजेच्या गोष्टींचादेखील विचार केला आहे. वर्कआऊटसाठी जॉनने घरातच जीम केली आहे. बऱ्याच वेळा या जीममधील फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. जॉनचं हे घर तयार करण्यासाठी १४ महिन्यांचा कालावधी लागला आहे. (Abraham John Architects / Photographs © Alan Abraham) -
जॉन आणि त्याचा पाळीव श्वान
-
जॉन अब्राहमची लक्झरी लाइफस्टाइल

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर