-
भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांचा यावर्षी जानेवारी महिन्यात दुबईत साखरपुडा झाला. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. (सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
जुलै महिन्यात नताशाने मुलाला जन्म दिला. पुत्ररत्न झाले.हार्दिक-नताशा आई-बाबा झाले असले तरी त्यांनी लग्न केले आहे की नाही याबाबत अद्याप हार्दिकने स्पष्ट केलेले नाही.
-
हार्दिकने नताशा गरोदर असल्याचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरातच एक धार्मिक विधी केल्याचा फोटो पोस्ट केला होता. पण त्याबद्दल त्याने अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही.
-
नेहा धुपियाने अंगद बेदी बरोबर लग्न केले. त्यांना मेहर नावाची मुलगी आहे. मागच्यावर्षी मे महिन्यात खासगी समारंभात त्यांनी लग्न केले.
-
काही महिने सर्वांपासून दडवून ठेवल्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे जाहीर केले. नेहा धुपिया लग्नाआधीच गर्भवती होती.
-
१७ जुलैला अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रएला डेमेट्रियड्सने मुलाला जन्म दिला. अजून त्यांचे लग्न झालेले नाही.
-
पत्नी मेहर जेसियासोबत अजूनही अर्जुन रामपालचा घटस्फोटाचा खटला सुरु आहे. अर्जुन आणि मेहर लग्नानंतर २० वर्षांनी विभक्त झाले.
-
अमृता अरोराने प्रियकर शकील लडाक सोबत विवाहाची घोषणा करुन सर्वांनाच धक्का दिला. अमृताने ती गर्भवती असल्याचे जाहीर केल्यानंतर लग्नाआधीच ती गर्भवती असल्याची चर्चा सुरु झाली होती.
-
ऑक्टोबर २०१६ मध्ये अभिनेत्री लिसा हेडन विवाहबंधनात अडकली. मे २०१७ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. लग्नाआधीच ती गर्भवती असल्याची चर्चा रंगली होती. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.
-
अॅमी जॅक्सनने प्रियकर जॉर्ज सोबत साखरपुडयाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती गर्भवती असल्याचे जाहीर केले होते.
-
कोकणा सेन शर्मा चे रणवीर शौरी सोबत प्रेमसंबंध होते. बराचकाळ दोघे एकमेकांना डेट करत होते. गुपचूपपणे दोघांनी लग्न केले आणि काही महिन्यात गर्भवती असल्याचे कोकणाने जाहीर केले. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.
-
निर्माते बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या प्रेमसंबंधांची बरीच चर्चा होती. अखेर दोघांनी लग्न केले. पण लग्नाआधीच आपण गर्भवती असल्याचे श्रीदेवी यांनी मान्य केले होते. बोनी कपूर यांच्याबरोबर लग्न झाले, तेव्हा श्रीदेवी यांना सातवा महिना सुरु होता. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.
-
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता यांचे वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचडर्ससोबत प्रेमसंबंध होते. त्या रिचडर्स यांच्यापासून गर्भवती होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास रिचडर्स यांनी नकार दिला, तेव्हा नीना गुप्ता यांनी मुलीला मसाबाला जन्म दिला व एकटयानेच तिचे पालनपोषण केले.
-
अभिनेत्री सारिका यांचा आता कमल हासन यांच्याबरोबर घटस्फोट झाला आहे. त्यांना कमल हासन यांच्यापासून दोन मुली आहेत. श्रुती हासनच्या जन्मानंतर दोन वर्षांनी कमल आणि सारिका यांनी लग्न केले.
-
परदेस फेम अभिनेत्री महिमा चौधरी लग्नाआधीच गर्भवती होती. उद्योजक बॉबी मुखर्जीसोबत महिमा यांनी १९ मार्च २००६ रोजी लग्न केले. त्यावेळी महिला पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”