-
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करतात. परंतु अनेकदा त्यांना यामुळे ट्रोल देखील केलं जातं. या फोटो गॅलरीत आपण २०२०मध्ये सर्वाधिक ट्रोल झालेले सेलिब्रिटी पाहणार आहोत.
-
आलिया भट्ट – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आलियाला ट्रोल करण्यात आलं. बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे त्याचा मृत्यू झाला अन् त्याला आलियासारखे सेलिब्रिटी किड्स जबाबदार आहेत. असा आरोप काही नेटकऱ्यांनी करत तिला ट्रोल केलं. परिणामी तिचा 'सडक २' हा चित्रपट सुपरफ्लॉप तर ठरलाच पण त्यासोबत तिचे फॉलोअर्स देखील कमी झाले.
-
सोनम कपूर – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोनमला ट्रोल करण्यात आलं. सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीची संशयीत आरोपी म्हणून चौकशी सुरु होती. त्यावेळी सोनमनं रियाला पाठिंबा दिला. परिणामी संतापलेल्या नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं होतं.
-
दीपिका पदुकोण – जानेवारी महिन्यात 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका जेएनयुमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात तिने देखील भाग घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या काही नेटकऱ्यांनी दीपिकावर टीका करत तिला ट्रोल केलं.
-
कंगना रणौत – ही अभिनेत्री कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मात्र यंदाच्या वर्षी ती अधिक चर्चेत होती. बॉलिवूडमधील घराणेशाही, सुशांत मृत्यू प्रकरण, शेतकरी आंदोलन अशा विविध विषयांवर तिने प्रतिक्रिया दिली. अर्थात तिच्या प्रतिक्रिया न आवडलेल्या नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
-
कनिका कपूर – करोना विषाणूची लागण झालेली कनिका ही पहिली सेलिब्रिटी होती. तिच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना करोनाची लागण झाली. परिणामी तिला ट्रोल करण्यात आलं.
-
मिलिंद सोमण – हा बॉलिवूडमधील सर्वाधिक तंदुरुस्त कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने एक न्यूड फोटो शेअर केला होता. परिणामी संतापलेल्या नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केलं.
-
मुकेश खन्ना – 'शक्तिमान' या सुपरहिरो मालिकेमुळे नावारुपास आलेले मुकेश खन्ना कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. परंतु अलिकडेच त्यांनी देशातील स्त्रियांना नोकरी करण्यापासून रोखायला हवं. घर सांभाळणं ही त्यांची मुख्य जबाबदारी असते असं वक्तव्य केलं होतं. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. परिणामी संतापलेल्या नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं.
-
प्रियांका चोप्रा – या अभिनेत्रीनं भारतातील प्रदुषणावर टीका करत पाश्चात्य देशांची स्तुती केली होती. यामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी तिचे सिगरेट पितानाचे फोटो शेअर करुन तिला ट्रोल केलं.
-
रिया चक्रवर्ती – सुशांत मृत्यू प्रकरणात रिया संशयित आरोपी होती. शिवाय ड्रग्ज प्रकरणातही ती पकडली गेली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिला जोरदार ट्रोल करण्यात आलं.
-
सैफ अली खान – संपूर्ण वर्ष सैफ वादग्रस्त मुद्द्यांपासून दूर राहिला. परंतु अलिकडेच त्याने 'आदिपुरुष' या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारणार आहे. या निमित्तानं त्याने रावणाची स्तुती केली. ही स्तुती काही नेटकऱ्यांना आवडली नाही त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”