'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ईशा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी जोडली गेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ईशा चाहत्यांशी संवाद साधते, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ईशाने अलीकडेच तिचे काही फोटो शेअर केलं आहेत. -
हा फोटो पाहून ईशाने तिचा मेकअप ओव्हर केल्याचा दिसतेय. फोटोत ईशाने केस शॉर्ट केल्याचे पाहिला मिळत आहेत. शॉर्ट हेअरमध्ये ईशा आणखी छान दिसतेय.
चाहत्यांनी देखील तिचा हेअर कट आवडलेला दिसतोय. ‘जय मल्हार’ या मालिकेतून बानूच्या भूमिकेत लोकप्रिय ठरलेल्या ईशा केसकरने ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘वुई आर ऑन’सारख्या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. ईशा ठरवून अभिनय क्षेत्रात आलेली नाही. मानसशास्त्राचे पदवी शिक्षण सुरू असताना सहज म्हणून नाटकाकडे वळलेल्या ईशाने एकाक्षणी या क्षेत्रातच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. इशा अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत असून सोशल मीडियावर ती फोटो शेअर करत असते. सौंदर्य आणि अभिनयशैली यांच्या जोरावर आज इशाचे असंख्य चाहते असल्याचं दिसून येतं. इशाने मराठी मालिकांप्रमाणेच काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ ईशा केसकर

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL