-
गेल्या काही काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे मनोरंजनाचं एक उत्तम माध्यम म्हणून पाहिलं जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'नेटफ्लिक्स', 'अॅमेझॉन प्राईम', 'हुलू', 'हॉटस्टार', 'एम एक्स प्लेअर' यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरुन एकापेक्षा एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी जगभरातील कलाकारांनी आता आपलं लक्ष चित्रपट आणि मालिकांसोबतच वेब सीरिजच्या दिशेने देखील वळवलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळात सैफ अली खान, प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, आर. माधवन, शमिता शेट्टी यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी वेब सीरिजच्या दिशेने आपलं लक्ष वळवलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या यादीमध्ये आता अभिनेता ऋतिक रोशन याचं दखील नाव जोडलं जातं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऋतिक लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही आगामी सीरिज‘द नाईट मॅनेजर’ या ब्रिटीश टीव्ही मालिकेचे हिंदी रिमेक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही मालिका गुप्तहेर संघटनेच्या काम करण्याच्या शैलीवर आधारित आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऋतिकच्या या आगामी सीरिजचं नावं अद्याप निश्चित केलेलं नाही. सध्या त्याच्या पटकथेवर काम सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऋतिक हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर त्याचे ओटीटी पदार्पण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

अखेर अर्जुन जिंकला! साक्षी-प्रियाच्या हाती बेड्या…; नाटकी धाकट्या सुनेला पूर्णा आजी कानाखाली मारणार, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल