-
अभिनेता सलमान खान याने आजवर अनेक नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मदत केली आहे. या फोटो गॅलरीत आपण सलमानच्या मदतीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री पाहणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्नेहा उल्लाल – या अभिनेत्रीनं सलमान खानच्या लकी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे स्नेहाचा चेहरा अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखा दिसतो असंही अनेकांनी म्हटलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
वरिना हुसेन – हिने लव्ह यात्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
डेजी शाह – 'जय हो' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे डेजी शाह. या चित्रपटात अभिनेता सलमान खानदेखील मुख्य भूमिकेत झळकला होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करु शकला नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अथिया शेट्टी – अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी हीदेखील अभिनेता सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. परंतु, अथियाचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
प्रनुतन भाल – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुतन यांची नात प्रनुतन हिने सलमानच्या मदतीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २०१९ साली ती नोटबूक या चित्रपटात झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सई मांजरेकर – प्रसिद्ध मराठी अभिनेते, निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिने सलमानच्या दबंग ३ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सना खान – बिग बॉसमुळे लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीला सलमानने 'जय हो' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. हा चित्रपट तिकिटबारीवर फार कमाल करु शकला नाही. परंतु सना मात्र खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शेफाली जरीवाला – 'काटा लगा' या म्युझिक अल्बममुळे ही अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली होती. तिला सलमाननं 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोनाक्षी सिन्हा – 'दबंग गर्ल' म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर सोनाक्षीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोनल चौहान – मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीला सलमान खाननं 'जन्नत' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
झरीन खान- अभिनेत्री कतरिना कैफप्रमाणे दिसणाऱ्या झरीन खानने 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सलमान खान आणि सोहेल खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमिका चावला – 'तेरे नाम' हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भूमिकाने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”