२०२० या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक दक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नव्या वर्षातदेखील असेच काही रिमेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊया २०२१मध्ये कोणत्या चित्रपटांचे हिंदी रिमेक आपल्याला पाहायला मिळतील… शाहिद कपूरचा 'जर्सी' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. विशेष म्हणजे या तेलुगू चित्रपटाचं मूळ नावदेखील जर्सीचं आहे. जर्सी या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम टिन्नानुरी यांनी केले असून तेच या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, अर्जुन रायचंदची भूमिका साकारणार आहे. लालसिंग चड्ढा- लालसिंग चड्ढा हा चित्रपट बर्याच दिवसांपासून चर्चेत होता. हॉलिवूडचा फॉरेस्ट गंप या सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या रिमेकमध्ये आमिर खान सरदारची भूमिका साकारत आहे. तर आमिरसोबत या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. द गर्ल ऑन द ट्रेन – २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या पॉला हॉकिन या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा आता हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळ चित्रपटात, एमिली ब्लंडने घटस्फोटित स्त्रीची भूमिका साकारली होती, तर हिंदी रिमेकमध्ये परिणीती चोप्रा ही भूमिका साकारणार आहे. विक्रम वेधा- विक्रम वेधा या तामिळ भाषेतील चित्रपटाचा २०२१ मध्ये हिंदी रिमेक येणार आहे. हिंदी रिमेकच नाव हे विक्रम वेधा असंच असणार आहे. चित्रपटात सैफ अली खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येतं. रॅम्बो – रॅम्बो हा हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा रॅम्बोची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूड स्टार सिल्वेस्टरच्या पावलावर पाऊल ठेवून टायगर रफ अँड टफ मॅनची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. तडप – तडप हा चित्रपट आरएक्स 100 या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहली आहे. मिलन लूथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. द इंटर्न – हा रिमेक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची मूळ कथा ही ७० वर्षीय महिलेभोवती फिरताना दिसते. वयाच्या ७० व्या वर्षीही महिला नोकरीच्या शोधात जाते आणि एका ठिकाणी इंटर्न म्हणून काम करते. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका होती.मात्र, ऋषी कपूर यांचं अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी अन्य कोणता कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. डियर कॉमरेड – २०१९मध्ये धर्मा प्रोडक्शनने दाक्षिणात्य चित्रपट डियर कॉमरेडच्या रिमेकचे राइट्स विकत घेतेले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम