बॉलिवूडमध्ये ८०-९०चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजेच सनी देओल. ‘ये ढाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है न, तो आदमी उठता नहीं उठ जाता है’ या एका संवादामुळे त्याने अनेकांच्या मनावर राज्य केलं. मोठ्या पडद्यावर 'अँग्री मॅन' वाटणाऱ्या सनी देओलने एकदा शूटिंगदरम्यान अनिल कपूर यांचा गळा आवळला होता. सनी आणि अनिल कपूर यांनी 'जोशीले' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या चित्रपट अभिनेत्री श्रीदेवीचीही भूमिका होती. या चित्रपटात श्रेयनामावलीत अनिल कपूर यांचं नाव सनी देओलच्या आधी दाखवलं गेलं होतं. याच गोष्टीमुळे तो नाराज झाला होता. नंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी समजावल्यानंतर तो शांत झाला होता. त्यानंतर त्याचवर्षी अनिल कपूर आणि सनी देओल यांनी 'राम अवतार' या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटात सनी देओल हा अनिल कपूर यांना मारतोय, असा एक अॅक्शन सीन होता. यामध्ये सनीला अनिल कपूर यांचा गळा आवळायचा होता. या सीनसाठी दिग्दर्शकांनी आधीच सनीला सूचना दिल्या होत्या. गळा जास्त आवळू नको असंही त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. मात्र सीन शूट करताना सनीला जुन्या गोष्टी आठवल्या आणि त्याने त्याचा राग अनिल कपूर यांच्यावर काढला. दिग्दर्शकांनी कट बोलल्यानंतरही सनीने अनिल कपूर यांचा गळा सोडला नव्हता. अखेर दिग्दर्शकांना सनीजवळ जाऊन त्याला थांबवावं लागलं होतं. या चित्रपटानंतर अनिल कपूर आणि सनी देओल कधीच एकमेकांशी चांगले बोलले नाहीत. सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया

Photos: गौतमी पाटीलचे घर पाहिलेत का? दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमधून दाखवली झलक