-
मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेचा प्रॉपर्टी सेलनं मोठी कारवाई करत मॉडेल आणि अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली. गहनावर असलेल्या आरोपानं मात्र, सगळीकडे खळबळ उडाली. (Photos/instagram/gehana_vasisth)
-
स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असलेली गहना वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याचा आरोप आहे.
-
पोलिसांनी शुक्रवारी मालाड-मालवणी परिसरातील मढमध्ये असलेल्या ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी पोलिसांनी दोन अभिनेत्यांसह एक लाईटमॅन, एक महिला फोटोग्राफर आणि एका ग्राफिक डिझायनरला अटक केली होती.
-
पोलिसांनी घटनास्थळावरून एचडी व्हिडीओ कॅमेरा, सहा मोबाईल, एक लॅपटॉप आणि व्हिडीओ असलेलं मेमरी कार्ड जप्त केलं होतं.
-
पॉर्न व्हिडीओ बनवणाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली होती. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
-
पोलिसांच्या कारवाईनंतर गहना वशिष्ठ कोण, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
-
मिस आशिया बिकिनी पुरस्कार जिंकलेली गहना एक मॉडेल व अभिनेत्री आहे. तिने अनेक जाहिराती, हिंदी आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे. इतरही अडल्ट वेब सीरीजमध्ये ती झळकली आहे.
-
पोलिसांच्या माहितीप्रमाणे गहनाने ८७ पॉर्न व्हिडीओ केले होते आणि ते व्हिडीओ स्वतःच्या वेबसाईटवर अपलोड केले.
-
हे व्हिडीओ बघण्यासाठी पैसे भरून सबस्क्रिप्शन घेणं आवश्यक होतं. वेब साईटवरील व्हिडीओ बघण्यासाठी लोकांना दोन हजार रूपये भरावे लागत होते.
-
चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचं आमिष दाखवून नवीन चेहऱ्यांच्या शोधात एक रॅकेट असल्याचं पोलिसांना कळालं होतं. नवीन लोकांना भेटल्यानंतर हे लोक त्यांच्याकडून अश्लील सीन करून घ्यायचे त्यानंतर पॉर्न फिल्ममध्ये काम करायला लावायचे. (Photos/instagram/gehana_vasisth)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया