-
मराठी अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीने ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली.
-
अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
-
अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.
-
आता गँगस्टर अरुण गवळी आजोबा होणार असल्याचे समोर आले आहे.
-
अभिनेता अक्षय वाघमारे लवकरच बाबा होणार आहे. अक्षयची पत्नी योगिता गरोदर असून तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो अक्षयने शेअर केले आहेत.
-
'पाहुणा घरी येणार येणार गं…' असं कॅप्शन देत अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
-
मुंबईतल्या दगडी चाळीतच हा सोहळा पार पडला.
-
अनेकांनी त्यांना कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – अक्षय वाघमारे / इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या