-
कलाविश्व म्हटलं की येथे सेलिब्रिटींच्या अफेअर, ब्रेकअपच्या चर्चा कायमच रंगत असतात. आतापर्यत कलाविश्वातील अनेक जोडप्यांचे अफेअरर्स आणि ब्रेकअप सोशल मीडियावर चांगलेच गाजले आहेत. यात जॉन अब्राहम आणि बिपाशा बासूच्या रिलेशनबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण बिपाशा अगोदर सुद्धा एक अभिनेत्री जॉनच्या आयुष्यात आली होती, जिच्या सोबत जॉनला लग्न करायचे होते. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्री बद्दल…
-
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री बिपाशा बासूच्या रिलेशनबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे कारण बी-टाऊनमधील ते सगळ्यात लोकप्रिय कपल पैकी एक होते. मात्र ९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.
-
त्याच्या बऱ्याच वर्षांनंतर जॉनने प्रिया रुनचांल आणि बिपाशाने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले.
-
बिपाशाच्या आधी जॉन मून मून सेन यांची लेक रिया सेनच्या प्रेमात होता. रिपोर्ट्सनुसार जॉन आणि रियाची भेट ९०च्या दशकाच्या शेवटी झाली होती.
-
रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, तर जॉन त्यावेळी एवढा लोकप्रिय नव्हता. त्यावेळी तो एक स्ट्रगलिंग अभिनेता असून तो फक्त मॉडेलिंग करायचा.
-
असे म्हटले जाते की जॉन आणि रिया लगेचच रिलेशनशिपमध्ये आले. जॉनचे रियावर एवढे प्रेम होते की त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते.
-
मात्र, रियाला बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण करायची होती आणि तिच्या मनात लग्न करायची इच्छा नव्हती, म्हणून रियाने जॉनला नकार दिला. त्यानंतर ते विभक्त झाले आणि जॉनच्या बॉलिवूड करिअरची एक चांगली सुरूवात झाली.
-
जॉनने २००३ मध्ये पाप या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जिस्म, धूम, दोस्ताना सारख्या अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले.
-
दुसरीकडे रियाचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले आणि त्यानंतर तिने बंगाली चित्रपटात काम केले.
-
जॉनने नंतर प्रियाशी लग्न केले. जॉन नेहमीच त्याची पत्नी प्रियाची स्तुती करताना दिसतो आणि बऱ्याच वेळा बोलतो की तिच्यामुळे माझ्या आयुष्यात स्थिरता आली आहे. तर रियाने तिचा बॉयफ्रेंड शिवम तिवारी याच्याशी लग्न केले.

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव