-
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (सर्व फोटो सौजन्य – पूजा सावंत / इंस्टाग्राम)
-
पूजा सावंत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्तर', ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात तिने शंकरा ही भूमिका साकारली होती.
-
मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे किंवा चित्रपटांचे फोटो, पोस्टर शेअर करत असते.
-
पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर पूजाच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगली पसंती दर्शवली आहे.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…