-
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. (Photos: Express / Instagram)
-
फरदीन खानमध्ये झालेला शारिरीक बदल पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
-
हेअर स्टायलिस्ट आलीम हकीमने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर फरदीन खानचे काही फोटो शेअर केले आहेत.
आलीम हकीने आधी चेहरा लपवला होता, पण नंतर जेव्हा तो फरदीन खान असल्याचं समोर आलं तेव्हा मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (Photo: Varinder Chawla) फोटोमध्ये फरदीन खान पुन्हा एकदा आपल्या जुन्या फिट आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (Photo: Varinder Chawla) -
त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
डिसेंबर २०२० मध्ये फरदीन दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्या कार्यालयाबाहेर दिसला होता. यावेळी पहिल्यांदा त्यांचा फिट लूक समोर आला होता. (Photo: Varinder Chawla) -
इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत फरदीनने आपण सहा महिन्यात १८ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला होता. (Photo: Varinder Chawla)
-
"मला शारिरीकदृष्ट्या २५ वर्षांचं व्हायचं आहे. शरीर आणि मेंदूचं कनेक्शन भासलं पाहिजे. माझ्या वाचनात हे आलं होतं. त्यानंतर मी योग्य आणि सकस आहार घेत आहे. याशिवाय योग्य व्यायाम करतो आहे. गेल्या सहा महिन्यात मी १८ किलो वजन कमी केलं असून अजूनही ३५ टक्के भाग पूर्ण करायचा आहे. आम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करतो तिथे चांगलं दिसणं अपेक्षित आहे," असं फरदीनने मुलाखतीत सांगितलं होतं.
-
फरदीनला याआधी आपल्या जाडेपणामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. २०१६ मध्ये व्हायरल फोटोवरुन त्याची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर त्याने आपल्याला कोणतीही लाज वाटत नसून आनंदी जगत असल्याचं ट्विट केलं होतं.
-
फरदीन खानने १९९८ मध्ये प्रेम अगन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नो एन्ट्री, प्यार तुने क्या किया, जंगल असे अनेक हिच चित्रपट त्याच्या नावावर आहेत. २०१० मध्ये आलेल्या 'दुल्हा मिल गया' या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. १० वर्षांनी फरदीन खान पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.

“आमचं लग्न खूप आधीच मोडलं असतं…”, काजोलचं वक्तव्य; अजय देवगणबद्दल म्हणाली, “आम्ही खूप…”