-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे नयनतारा.
-
गेल्या काही दिवसांपासून नयनतारा विग्नेश शिवनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होते.
-
आता नयनताराने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये हातात साखरपुड्याची अंगठी घातली असल्याचे दिसत आहे.
-
हा फोटो शेअर करत तिने तामिळ भाषेत 'मी माझे आयुष्य तुझ्या हातात देते' असे कॅप्शन दिले आहे.
-
नानुम राऊडी या चित्रपटाच्या सेटवर नयनतारा आणि विग्नेश यांची भेट झाली होती.
-
२०१५ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत.
-
पण दोघांनीही कधी उघडपणे यावर वक्तव्य केले नाही.
-
एकेकाळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये नयनतारा आणि कोरिओग्राफर, दिग्दर्शक प्रभूदेवा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
त्यावेळी प्रभूदेवा विवाहित होता.
-
इतकच नव्हे तर नयनतारामुळे प्रभू देवाचा संसार मोडला असल्याचे म्हटले जात होते.
-
दरम्यान ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
-
नयनताराने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली होती.
-
२००३मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
-
आजवर तिने हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग