-
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते.
-
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री प्रियंका चोप्राने चक्क सातासमुद्रापार होळी सणाचा आनंद लुटला आहे. होळीच्या रंगात रंगलेला एक फोटो शेअर करत त्याला तिने 'होळी, रंगांचा हा उत्सव माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. अपेक्षा आहे कि आपण सर्व आपल्या प्रियजनांसोबत हा सण साजरा करत असाल. मात्र आपल्या घरात.' असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियंकासोबत निक जोनास आणि तिचे सासू-सासरे दिसत आहेत.
-
यंदाही प्रियांका परदेशातच होळीचा सण साजरा करत असली तरी होळी उत्साहात साजरी करत असल्याचे दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य – प्रियांका चोप्रा / इंस्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग