-
‘फॅशन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडसे.
-
आज ती अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे.
-
पण मुग्धाचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
-
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मुग्धा एका पेट्रोल पंपावर काम करत होती.
-
या कामाचे तिला दिवसाला १०० रुपये मिळायचे.
-
२६ जुलै १९८६ रोजी मुग्धा गोडसेचा जन्म पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
-
पुण्यातच कॉमर्स शाखेतून तिने आपले शिक्षण पूर्ण केलं.
-
मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुग्धा पुण्याहून मुंबईला आली.
-
त्यानंतर तिला मधुर भांडारकर यांच्या ‘फॅशन’ चित्रपटात तिला भूमिका मिळाली.
-
चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले आणि तिला फिल्मफेअरचा ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कारही मिळाला.
-
त्यानंतर ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘हिरोईन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.
-
२०१० मध्ये ‘जेल’ चित्रपटासाठी मुग्धाला ‘स्टारडस्ट’चा पुरस्कार मिळाला होता.
-
तिने ‘खतरों के खिलाडी’च्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेतला होता.
-
मुग्धा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
-
मुग्धा राहुल देवला डेट करत आहे.
-
त्या दोघांमध्ये तब्बल १४ वर्षाचे अंतर आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL