-
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदीवला जात आहेत. तिथून ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना अपडेट देत असतात. (सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
दिया लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. दिया सध्या आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिथलाच एक फोटो तिने शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे.
-
आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे गेली आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर.
-
अभिनेत्री जान्हवी कपूर मालदीवमध्ये तिच्या मित्र मैत्रिणींसोबत धमाल करतेय. मालदीवमधील काही हॉट फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री शेफाली जरीवाला पती पराग त्यागीसोबत सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करतेय. मालदीवमधील हॉट आणि बोल्ट फोटो शेअर करून ती अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मालदीवच्या निर्सगरम्य किनाऱ्यावरचा हा सुंदर फोटो. बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इथे सुट्ट्यांचा आनंद घेतला.
-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी. शिल्पाने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मालदीवला गेल्यानंतर अभिनेत्री कियारा आडवाणीनं आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे.
-
अभिनेत्री अनन्या पांडे अगदी अल्पावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनन्याने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री कतरिना कैफ मालदीवमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत होती येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. कधी बीचवर तर कधी समुद्रात जाऊन हिनाने खास फोटो शूट केलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेले होते.
-
एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एरिका फर्नाडिस मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत होती.
-
पती गौतम किचलूसोबत मालदीवला हनीमूनला गेलेल्या अभिनेत्री काजल अगरवालने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
छोट्या पडद्यावरील नागिन अर्थात मौनी रॉय मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला. सोशल मीडियावर मौनीनं फोटो पोस्ट केले आहेत.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग