-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. ‘पिंजरा’ या मालिकीद्वारे भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या समोर आली. (सर्व फोटो सौजन्य – संस्कृती बालगुडे / इन्स्टाग्राम)
-
छोट्या पडद्यावर वावर असणाऱ्या या अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. निखळ हास्य आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर संस्कृतीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.
-
'सांगतो ऐकना', 'शॉर्टकट', 'निवडूंग', ‘एफयू – फ्रेंडशिप अनलिमिटेड’, 'टेक केअर गूड नाईट', 'भय' आणि 'सर्व लाईन व्यस्त' यांसारख्या अनेक चित्रपटांतून संस्कृतीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. त्यामुळे सतत ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत असते.
-
संस्कृतीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
संस्कृतीने परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
संस्कृतीचा आणखी एक खास अंदाज. "…… निर्मळ, कोमल, तेज ग जैसे तुटत्या ताऱ्यांचं…." असं कॅप्शन देत संस्कृतीने हे फोटो शेअर केले आहे.
-
साडीतील संस्कृतीच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. "खूप दिवसांनी सारं दाटून आलंय… सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय….! ____ प्रतिक्षा" असं कॅप्शन देत संस्कृतीने हे फोटो शेअर केले आहे.
-
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून ग्लॅमरस गर्ल म्हणून प्रेक्षकांसमोर वावरणाऱ्या संस्कृतीचा फिटनेस फंडा हा आजच्या तरुणाईला साजेसा असाच आहे.
-
सोशल मीडियावर संस्कृतीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल