-
लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस आहे. (सर्व फोटो सौजन्य : किशोरी शहाणे / इन्स्टाग्राम)
-
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मराठी कलाविश्वामध्ये या चित्रपटाचं स्थान आजही अढळ आहे. याच चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला.
-
१७ व्या वर्षी पहिला चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळविला.
-
अकरावीत असताना किशोरी यांनी ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन होईपर्यंत जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केलं.
-
‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातून करिअरची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांचा प्रत्येक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
मराठी कलाविश्वात दबदबा निर्माण झाल्यानंतर किशोरी यांनी त्यांचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळविला होता.
-
स्टेट्सची नाटकं करत असताना वामन केंद्रे यांनी डायरेक्ट केलेल्या शतुरमुर्ग या हिंदी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर शिवदास गोडके यांनी डायरेक्ट केलेलं महाभोजन तिरव्याचे हे नाटक पदरात पडलं. यापुढे माझा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला. मग मोरुची मावशी आणि तत्सम व्यावसायिक नाटकं सुरु झाली आणि मी या फिल्डरमध्ये टिकून राहिले.
-
अफाट चाहतावर्ग असलेल्या या अभिनेत्रीने चित्रपट दिग्दर्शक दिपक बलराज वीज यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं असून त्यांची लव्ह स्टोरी फार रंजक आहे.
-
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. "दीपक यांनी २२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हफ्ता बंद’मध्ये जॅकी श्रॉफ हिरो होता आणि त्यावेळी मी मराठी चित्रपटात काम करत होते. तेव्हा जॅकीची आणि माझी ओळख महाकाली, होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये झाली. त्याठिकाणी तो शूटिंगला यायचा. तेव्हा आमच्याच मैत्री वाढली. तेव्हा तो म्हणाला की ‘एक डायरेक्टर है उनको मराठी अॅक्ट्रेस चाहिए’. त्यानंतर जॅकीने माझी ओळख दीपक बलराजशी करून दिली." दीपक यांनी मला ‘हफ्ता बंद’ चित्रपटात भूमिका दिली. सेटवर आमची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात रुपांतर झालं.
-
दीपक यांनी मला ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही कास्ट केलं. पण तेव्हा आमच्या नात्याबद्दल आईवडिलांना समजलं होतं. त्यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली होती. तेव्हा कुटुंबीयांना खरं काय ते सांगणं भाग होतं. त्यांनीही आमच्या लग्नास होकार दिला.
-
किशोरी आणि दीपक बलराज यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे.
-
किशोरीने दिपक यांच्या ‘हप्ता बंद’, ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर किशोरी यांनी काही हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यातल्या ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच अनेक लोकप्रिय मालिका आणि नाटकांमध्येही त्या झळकल्या आहेत.
-
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हॉलीवूडपटांपर्यंत झेप घेतली आहे. ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित चित्रपटांचा लेखक आणि ‘मेक युवर मूव्ह’चा दिग्दर्शक डय़ुएन अॅडलेरच्या आगामी चित्रपटात किशोरी शहाणे यांनी काम केले. नृत्यदिग्दर्शन आणि नृत्याचे वेगवेगळे फॉम्र्स यांना कथेतून हाताळणाऱ्या ‘स्टेप अप’ चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा जॉनर दिग्दर्शक म्हणून डय़ुएन अॅडलेर यांनी यशस्वी केला. त्यांचा ‘हार्टबीट्स’ हा चित्रपटही नृत्यावर आधारित असून या इंडो-अमेरिकन चित्रपटासाठी त्यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांची निवड केली.
-
दादा कोंडके यांचा पुतण्या विजय कोंडकेंनी माहेरची साडी चित्रपटासाठी काम केलं. माझ्या वाढदिवशी चित्रपटाची शूटिंग सुरू असताना दादा खास सेटवर आले आणि सेलिब्रेशन केलं. मला त्यांनी भेट म्हणून घड्याळ दिलं. ते घड्याळ मी अजूनही वापरते. ही गोष्ट १९९१ ची आहे. दादांनी दिलेलं घड्याळ अजूनही चालूच आहे,” असं किशोरी शहाणे त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सांगितलं.
-
मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन मध्ये किशोरी शहाणेंनी सर्वांची मनं जिंकली.

Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”