-
छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या मालिकेतून अभिनेत्री मौनी रॉय घराघरांत लोकप्रिय झाली. (सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)
-
एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मौनीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक मालिकांमधून झळकली. मात्र ‘देवो के देव महादेव’ या मालिकेतील तिची पार्वतीची भूमिका प्रेक्षकांना सर्वाधिक पसंत आली.
-
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या अभिनेत्री मौनी रॉयने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री मौनी रॉयची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा असते. मौनी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
-
मौनीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुर्यफुलांच्या बागेत मौनी उभी आहे. मौनीने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
उत्तम अभिनयसोबतच मौनी तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. तिचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच मौनी ब्रह्मास्त्र सिनेमात एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…