-
कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
-
ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.
-
पण शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना बऱ्याच वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
-
असेच काहीसे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंजुम फकीहसोबत घडले आहे.
-
अंजुमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केला होता.
-
या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत होती.
-
पण नेटकऱ्यांनी तिला बिकिनी परिधान केल्यामुळे ट्रोल केले आहे.
-
एका यूजरने 'अंजुम, असे कपडे घालू नकोस. तू मुस्लिम आहे तरी देखील असे कपडे का घातले?' असे म्हटले.
-
तर दुसऱ्या एका यूजरने 'हे काय आहे? मुस्लिम असूनही तू असे कपडे कशी घालू शकतेस?' असे म्हटले आहे.
-
अंजुमला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
-
यापूर्वी अंजुमने महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.
-
अंजुमने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तिने 'एक था राजा एक थी रानी', 'दिल ही तो है', 'देवांशी' आणि 'नागिन 5' या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तिला 'कुंडली भाग्य' आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकांनी लोकप्रियता मिळवून दिली.
-
२०२०मध्ये अंजुम 'कश्मकश' या वेब शो मध्ये दिसली होती.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल