-
अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन.
-
श्रुती दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे.
-
श्रुती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते.
-
नुकताच श्रुतीने 'झूम'ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.
-
'मी आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे एक्सायटेड होते. कारण ते आपापलं खासगी आयुष्य आपापल्या पद्धतीने जगू शकत होते. मला आनंद आहे की, ते दोघं वेगळे झाले आहेत' असे श्रुती म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, 'जर एखाद्या व्यक्तीला वेगळे व्हायचे असेल तर तुम्ही जबरदस्ती करुन त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. ते विभक्त झाल्यानंतरही एक चांगले पालक म्हणून वागत आहेत. मी माझ्या वडिलांच्या अतिशय जवळ आहे. माझी आई देखील चांगली वागत आहे आणि ती आमच्या आयुष्याचा एक भाग आहे.'
-
श्रुती आई-वडिलांनी जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा ती फार मोठी नव्हती.
-
'जेव्हा माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा मी फार मोठी नव्हते. ते एकत्र असताना आनंदी नव्हते पण वेगळे झाल्यानंतर आनंदी आहेत' असे श्रुती म्हणाली.
-
यापूर्वी एका मुलाखतीमध्ये श्रुतीने आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे सांगितले होते.
-
'इतरांप्रमाणेच मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जेव्हा शूटिंग सुरु होईल तेव्हा मला बाहेर पडून शूटिंग पूर्ण करावेच लागेल. माझ्यासुद्धा काही मर्यादा आहेत. मी माझ्या आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’ असे श्रुती म्हणाली होती.
-
लॉकडाउनपूर्वी श्रुती एक वेब सीरिज आणि एका चित्रपटासाठी काम करत होती.
-
या चित्रपटाचे नाव ‘सालार’ आहे.
-
या चित्रपटात श्रुती अभिनेता प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग