-
प्रेक्षकांचा लाडका सिध्दू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि त्याच्या कमाल विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे.
-
कलाविश्वाप्रमाणेच अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
सिद्धार्थच्या आई-वडिलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.
-
या सेलिब्रेशनचे काही फोटो सिद्धार्थने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
'सुखी संसाराची ५० वर्ष .. चि. रामचंद्र आणि चि.सौ.का. मंदाकिनी (तारा)… यांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा… २६ मे १९७१=२६ मे २०२१ – लवेश (दादा) ,पंकजाक्षी (पिंकी), सिद्धार्थ (सिध्दू)…' असं कॅप्शन देत सिद्धार्थनं हे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव / इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”