-
मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्याने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट, सीरिज हा चर्चेचा विषय ठरतो. पण मनोजचे खासगी आयुष्य फार चर्चेत नव्हते.
-
मनोज वाजपेयीचे पहिले लग्न मुंबईत येण्यापूर्वी झाले होते.
-
मनोजने दिल्लीतील एका मुलीशी लग्न केले होते.
-
पण त्यांचा संसार फारकाळ टिकला नाही.
-
मनोज त्याच्या करिअरमध्ये स्ट्रगल करत असल्यामुळे त्याचा घटस्फोट झाल्याचे म्हटले जाते.
-
नंतर मनोज मुंबईत आला आणि काम शोधू लागला.
-
एका चित्रपटाच्या वेळी त्याची ओळख अभिनेत्री नेहा म्हणजेच शबाना रझाशी झाली.
-
तिने 'करीब' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
१९९८ साली प्रदर्शित झालेल्या 'करीब' या चित्रपटात नेहासोबत अभिनेता बॉबी देओल दिसला होता. (Photo: Varinder Chawla)
-
त्याच दरम्यान मनोजचा 'सत्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मनोजला रातोरात स्टार बनवलं.
-
मनोज आणि नेहाच्या भेटी वाढू लागल्या होत्या. हळूहळू त्यांच्या मैत्रितील रुपांतर प्रेमात झाले.
-
५ वर्षे डेट केल्यानंतर २००६मध्ये लग्न केले.
-
नेहाने ‘होगी प्यार की जीत’, ‘फिजा’, ‘राहुल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिने तेलुगू आणि तमिळ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे.
-
तिचे नाव 'अवा' आहे.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS