-
अभिनेत्री विद्या बालन तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.
-
उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
नुकताच विद्या बालनने चाहत्यांशी संवाद साधला आहे. तिने इन्स्टाग्रामवरील फिचर 'AskMeAnything' द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत.
-
यामध्ये विद्याने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद सांगितले.
-
'चहा की कॉफी' त्यावर विद्याने 'कॉफी' असे उत्तर दिले.
-
दरम्यान एका चाहत्याने विद्याला 'सलमान खान की शाहरुख खान' असा प्रश्न विचारला होता.
-
चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देत विद्याने 'सिद्धार्थ रॉय कपूर (My SRK)' असे म्हटले.
-
विद्याला 'आवडता चित्रपट?' असा प्रश्न विचाराला होता. त्यावर तिने 'गोलमाल' असे उत्तर दिले.
-
विद्याला 'कोणता पदार्थ आवडतो', असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'ब्रेड पुडिंग' खूप आवडतं असं सांगितलं.
-
विद्या बालनचा लहानपणीचा फोटो. या फोटोमध्ये ती प्रचंड गोड दिसत आहे.
-
विद्याला 'आवडता अभिनेता?' असा प्रश्न विचाराला होता. त्यावर तिने 'अमिताभ बच्चन' असे उत्तर दिले.
-
'आवडतं ठिकाण कोणते' त्यावर विद्याने 'इटली' असे उत्तर दिले.
-
विद्याचा मोबाइलमधील वॉलपेपर.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्या बालन / इन्स्टाग्राम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…