-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. मालिकेत तारक मेहताची पत्नी अंजली भाभी ही कायम चर्चेत असते.
-
अंजली भाभी हे पात्र अभिनेत्री नेहा मेहताने साकारले.
-
१२ वर्षे नेहाने या मालिकेत काम केले.
-
पण २०२०मध्ये नेहाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
-
तिच्या निर्णयानंतर चाहत्यांना धक्काच बसला.
-
अनेकांनी नेहाला मालिकेत परत आणण्याची मागणी केली होती.
-
मालिकेच्या निर्मात्यांसोबत नेहाचे भांडण झाल्यामुळे तिने मालिका सोडल्याच्या अफवा सुरु होत्या.
-
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहाने मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले. '१२ वर्षे या मालिकेत काम केले. ही मालिका सोडणे माझ्यासाठी कठीण होते. मालिका सोडल्यानंतर मला जाणवले की मी आणखी वेगळ्या भूमिका साकारु शकते. मी गुजराती चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली' असे नेहा म्हणाली.
-
काही दिवसांपूर्वीच नेहाने गुजराती चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
-
या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
सध्या नेहा ही गुजराती चित्रपटांमध्ये काम करत आहे.
-
२००४ साली 'रात होने को हैं' आणि 'देस में निकला होगा चांद' या मालिकेत नेहाने काम केले.
-
यापूर्वी २००१ साली नेहाने गुजराती आणि २००३ साली धाम या तेलगु चित्रपटात काम केले आहे.
-
सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे.
-
सुनैना फौजदारचा देखील चाहता वर्ग मोठा आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम