-
भार्गवी चिरमुले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे.
-
भार्गवीने आतापर्यंत 'आयडियाची कल्पना', 'संदूक', 'धागेदोरे', 'अनवट' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
भार्गवी अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकली आहे.
-
मराठी चित्रपटांतून अगदी निवडक, चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेली भार्गवी नृत्यात पारंगत आहे हे तिच्या चाहत्यांना पूर्णपणे ठाऊक आहे.
-
अभिनयात चोख असलेली भार्गवी भरतनाट्यम् शिकली आहे म्हणण्यापेक्षाही ती यात निपुण आहे.
-
अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
भार्गवीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये भार्गवीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे.
-
या लूकमध्ये भार्गवी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
भार्गवीने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. फोटोग्राफर संदीप खाडेने तिचे हे फोटो काढले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : भार्गवी चिरमुले / इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Death Case : “तुला मुलगा होत नाही तर…”, सासरे-दिराकडून मयुरी जगतापला अश्लील शिवीगाळ? अंजली दमानियांकडून ‘ते’ पत्र शेअर