-
सध्या 'समांतर' ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजचा दुसरा सिझन १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडीत, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत.
-
'समांतर २' मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत झळकणार असून त्या दोघांचे बोल्ड सीन या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत.
-
'समांतर २'च्या सेटवरचे काही फोटो स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
'समांतर'च्या पहिल्या सिझनमध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनी पुन्हा एकदा 'समांतर २' मध्ये बोल्ड अंदाजात दिसून येणार आहे.
-
'समांतर'मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे.
-
'समांतर २'मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे.
-
यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.
-
या शोच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, 'समांतर २' चं दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत.
-
'समांतर २' ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित / इन्स्टाग्राम)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल