बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ ही राज कुंद्राच्या समर्थनार्थ समोर आली आहे. गहनाने एका व्हिडीओतून या प्रकरणाबद्दल भूमिका मांडली आहे. "बोल्ड आणि इरॉटिक (कामुक) चित्रपटांची तुलना पॉर्नशी करू नका," असं तिने म्हटलेलं आहे. पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी गहनालाही झाली होती. (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) गहना म्हणाली, "आम्ही पॉर्न व्हिडीओ बनवत नाही. हे सगळे व्हिडीओ एकता कपूरच्या 'गंदी बात'सारखेच आहेत. आमच्या सीरिजमध्ये एकता कपूरच्या सीरिजपेक्षाही कमी कामुकता आहे." (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) जे या चित्रपटांना पॉर्न समजतात त्यांना उद्देशून गहना म्हणाली, "जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात कुठेच अश्लिलता नाही. ते अश्लील चित्रपट नाहीत. ज्यांना शंका आहे त्यांनी गुगलवर जाऊन बघावं. त्यापैकी कोणताच चित्रपट पॉर्न श्रेणीत मोडला जाऊ शकत नाही. (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) तिच्या प्रेक्षकांबद्दल बोलताना गहना म्हणाली, "आमचे प्रेक्षक हे १८ वर्षांच्या पुढचे आहेत. त्यामुळे त्यांना पॉर्न आणि इरॉटिक चित्रपटांमधला फरक कळतो. " (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) मुंबई पोलिसांवर तिचा विश्वास असल्याचंही गहना म्हणाली, "मला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. आमचे व्हिडीओ पॉर्न व्हिडीओ नाहीत. ते बोल्ड व्हिडीओ आहेत. या आधी अनेक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी असे व्हिडीओ बनवले आहेत. मग अचानक काही लोकांना का लक्ष्य केलं जात आहे. " (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) "जे पॉर्न व्हिडीओ बनवतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही पॉर्न व्हिडीओ बनवत नाही", असंही गहना म्हणाली. (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) गहनाने राज कुंद्राच्या कंपनीसोबत ३ चित्रपटांसाठी काम केलेलं आहे. "राज कुंद्राने आपल्याला कधीच कोणती गोष्ट करण्यास जबरदस्ती केली नाही. चित्रपटात असणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर आक्षेप नव्हता किंवा सेटवर काम करताना कोणतीच अडचण आली नाही", असं तिने सांगितलं. (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) याआधी गहनाला पॉर्न व्हिडीओची निर्मिती आणि अॅपवर अपलोड करण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गहनाला मुंबई गुन्हे शाखेकडून फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. गहना ५ महिने तुरुगांत होती. (Photo Credit : Gehana Vasisth Instagram) -
त्यानंतर कुंद्राला अटक करण्यात आली. न्यायालयानं राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता राज कुंद्राच्या पॉर्न व्हिडीओच्या गोष्टींबद्दल शिल्पाला माहित असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं?