-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं नाव पॉर्नोग्राफीत आलं असल्याने सध्या बॉलिवूडपासून ते सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. मात्र यासोबत राज कुंद्रा नेमका पोलिसांच्या जाळ्यात अडकला कसा याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. तर यामागे कारणीभूत ठरला मढमधील एक बंगला.
-
मुंबई पोलिसांना ४ फेब्रुवारीला मढ आयलँडमधील एका बंगल्यात पॉर्न चित्रपटाचं शूटिंग सुरु असल्याची टीप मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लगेच तिथे छापा टाकला.
-
पोलीस बंगल्यात पोहोचले तेव्हा तिथे दोन व्यक्ती आक्षेपार्ह स्थितीत असून इंटिमेट सीन शूट केले जात होते.
-
यावेळी पोलिसांनी शूटमध्ये सहभागी पाच जणांना अटक केली आणि एका महिलेची सुटका केली.
-
मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत राज कुंद्राच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
-
मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये छापेमारी केली असता अनेक महत्वाचे पुरावे हाती लागले असल्याची माहिती दिली आहे.
-
मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, "पॉर्न चित्रपट प्रकरणाचा तपास करत असताना वेब सीरिजमध्ये काम देण्याच्या नावाखाली काही नवोदित अभिनेत्रींना बोल्ड सीन्स करायला लावण्यात आल्याची माहिती समोर आली. काही तरुणींनी आमच्याकडे तक्रार केली आणि हे सर्व शूट वेबसाईट आणि अॅप्सवर अपलोड करण्यात आले असल्याची माहिती दिली".
-
तपासादरम्यान पोलिसांना पॉर्न क्लिप्स प्रसिद्ध करणारे अॅप आणि राज कुंद्रा यांच्यात संबंध असल्याची माहिती मिळाली.
-
मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न रॅकेट प्रकरणात अटक आरोपी उमेश कामत राज कुंद्रासोबत काम करत असल्याची माहिती मिळाली.
-
अजून तपास केला असता राज कुंद्राची कंपनी विआनने हॉटशॉट्स अॅप्सची मालकी असणाऱ्या युकेमधील कंपनी केनरिनसोबत करार केल्याची माहिती मिळाली.
-
ही कंपनी युकेत असणाऱ्या राज कुंदाच्या बहिणीच्या पतीची असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.
-
सर्व पॉर्न क्लिप या हॉटशॉट अॅपवर अपलोड होत असत.
-
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटशॉट्स ही युकेमधील कंपनी असली तरी तिचं सर्व कामकाज राज कुंद्राच्या विआन कंपनीकडून चालवलं जात होतं.
-
विआनच्या ऑफिसमध्ये शोध घेतला असता आम्हाला अनेक महत्वाचे पुरावे मिळाले असल्याचं मिलिंद भारंबे यांनी सांगितलं आहे.
-
लॉकडाउनच्या काळात फटका बसल्याने भारतातच शूटिंग करत वी ट्रानस्फरच्या सहाय्याने क्लिप परदेशात पाठवल्या जात होत्या.
-
सायबर कायद्यापासून वाचण्यासाठी राज कुंद्राने परदेशातच या कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं होतं.
-
दरम्यान दीड वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या पॉर्नच्या व्यावसायातून राज कुंद्राने कोट्यवधी कमावले होते.
-
मुंबई क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने सुरुवातीला यामधून दिवसाला दोन ते तीन लाख रुपये कमाई केली आणि नंतर तो दिवसाला सहा ते आठ लाख कमावत होता. पोलिसांनी आतापर्यंत साडे सात कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
-
याशिवाय राज कुंद्राने पॉर्न व्यावसाय पोलिसांच्या रडारवर आल्यावर बॉलिफेम म्हणून प्लॅन बी सुद्धा आखला होता.
-
राज कुंद्रा लवकरच शूटिंग थांबवून बॉलिफेमवर मॉडेल्स आणि अभिनेत्यांकडून लाईव्ह स्ट्रिमिंग करुन घेणार होता अशी क्राइम ब्रांचला शंका आहे.
-
राज कुंद्रा सध्या पोलीस कोठडीत आहे. (सर्व फोटो सौजन्य : राज कुंद्रा / इन्स्टाग्राम)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल