-
सध्या इन्स्टाग्रामवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंची फारच चर्चा आहे.
-
या चर्चेला कारण म्हणजे या अभिनेत्रीने महाराष्ट्राचा पारंपारिक पेहराव असणाऱ्या साडीमध्ये थेट लंडनच्या रस्त्यांवर खास फोटो शूट केलं आहे.
-
सध्या या फोटोशूटमुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे कृतिका गायकवाड.
-
कृतिका गायकवाड ही सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कायम कनेक्टेड असते.
-
यावेळी तिने असेच काही स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो खास असण्याचं कारण म्हणजे तिने हे लंडनच्या रस्त्यावर नऊवारी साडी नेसून क्लिक केलेलं खास फोटोशूट आहे.
-
अनेकांनी या फोटोंवर कमेंट करुन आम्हाला तुझा अभिमान वाटतो असं म्हटलं आहे.
-
झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या माध्यमातून कृतिकाचा चेहरा घराघरात पोहचला. तिच्या डान्सचे प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
या फोटोंमध्ये कृतिका गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.
-
आपल्या भन्नाट डान्सबरोबरच सौंदर्यामुळे कृतिका ही सोशल नेटवर्किंगवर कायमच चर्चेत असते.
-
कृतिकाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. चाहत्यांनी या फोटोंवर कौतुकाचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
-
कृतिकाच्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर ११ हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत.
-
कृतिका गायकवाडने 'बंदिशाला' चित्रपटामध्ये केलेली ठसकेबाज लावणी चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या नेबर्स चित्रपटामध्येही कृतिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली.
-
विठ्ठला शपथ, आशियाना सारख्या मालिकांमध्येही कृतिका झळकली होती.
-
२०१५ मध्ये तिने लाखो हे दिलवाले या हिंदी चित्रपटामध्ये काम केलं होतं.
-
इन्स्टाग्रामवर कृतिकाचे एक लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो : instagram/krutikaim वरुन साभार)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला