-
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे, त्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तेथून लोक देशाबाहेर पळून जात आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी आधीच देश सोडून पळून गेले आहेत. या संकटाच्या काळात कोणताही देश अफगाणिस्तानच्या मदतीसाठी पुढे आला नाही.
-
दरम्यान, फार कमी लोकांना माहित आहे की अफगाणिस्तान आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये झाले आहे. पण आज आम्ही बोलणार आहोत त्या बॉलिवूड स्टार्स बद्दल जे अफगाणिस्तानचे आहेत.
-
सलीम खान- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान हे अफगाणिस्तानचे आहेत. त्यांचे पणजोबा पूर्वी अफगाणिस्तानमध्ये राहत होते. त्यावेळी अफगाणिस्तानात बरीच युद्धे झाली. त्यामुळे त्यांचे पूर्वज अफगाणिस्तान सोडून भारतात आले.
-
कादर खान- आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडीने करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे कादर खान एक अफगाणी होते. त्यांचा जन्म काबुल, अफगाणिस्तान येथे झाला. काही काळानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.
-
फिरोज खान- दिवंगत बॉलिवूड अभिनेता फिरोज खानचेही अफगाणिस्तानशी खास नाते होते. फिरोज हे अफगाणिस्तानचे पठाण होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गझनी येथे राहत होते. नंतर त्यांचे वडील गझनीहून भारतात आले आणि बंगलोरमध्ये स्थायिक झाले.
-
संजय खान- फिरोज खानचा धाकटा भाऊ आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय खान देखील एक अफगाणी आहे. त्याचे पूर्वज अफगाणिस्तानात राहत होते, नंतर ते लोक भारतातही स्थायिक झाले.
-
वारिना हुसैन- लव्ह यात्री चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वारिना हुसेन देखील अफगाणिस्तानची आहे. तीचा जन्म काबुलमध्ये झाला. वारिनाने आधी मॉडेलिंग केले आणि नंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

माजी आमदार चोथेंनी चार दशकांची शिवसेनेची साथ सोडली