-
सध्या बिग बॉस ओटीटी हा शो चर्चेत आहे. या शोमध्ये उर्फी जावेदने सहभाग घेतला होता.
-
पण बिग बॉसच्या घरात एक आठवडा घालवल्यानंतर उर्फीला बाहेर पडावं लागलं.
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फीने आरजे सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीमध्ये तिने एकदा तिचे काही अडल्ट फोटो एका वेबसाइटवर कुणी तरी अपडलोड केल्याचा खुलासा केला.
-
तसेच या परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबीयांनी देखील पाठींबा दिला नसल्याचे तिने सांगितले.
-
अनेकांना ती पॉर्नस्टार आहे असे देखील म्हटले होते.
-
'मी अकरावीमध्ये शिक्षण घेत होते. माझ्यासाठी तो कठीण काळ होता कारण माझ्या कुटुंबीयांनी देखील मला पाठींबा दिला नव्हता', असे उर्फी म्हणाली.
-
पुढे ते म्हणाली, 'माझे कुटुंबीय मला पॉर्नस्टार समजत होते. ते माझे बँकचे अकाऊंट चेक करुन त्यामध्ये कोट्यावधी रुपये नाहीत ना हे पाहणार होते. माझ्या कुटुंबीयांनी मला पॉर्न अभिनेत्री समजून टॉर्चर केले आणि हे दोन वर्षे सुरु होते.'
-
या सर्व गोष्टीमुळे उर्फीवर परिणाम झाला होता.
-
'मी माझे नाव देखील विसरले होते. लोक माझ्याविषयी वाटेल ते बोलत होते. जे माझ्यासोबत झाले ते कुणाच्याही सोबत होऊ नये' असे उर्फी म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, 'जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावरच आरोप केले तेव्हा माझ्याकडे बोलण्याचा अधिकार नव्हता. मी फक्त ते सहन करत होते.'
-
(all Photos: Urfi instagram)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो