-
मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ.
-
'नवरी मिळे नवऱ्याला', 'धुमधडाका', 'माझा छकुला', 'अशी ही बनवाबनवी'सारख्या मराठी चित्रपटांमधून लोकप्रिय अभिनेत्री म्हणून एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या निवेदिता जोशी-सराफ या पुन्हा एकदा 'झी मराठी' वाहिनीवरील 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतील 'आसावरी' या भूमिकेतून घराघरांत लाडक्या झाल्या.
-
तब्बल तीस वर्षे चित्रपट-नाटक आणि मालिकांमधून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या निवेदिता यांनी या माध्यमांचा बदलता काळ अनुभवला आहे. हा बदल स्वीकारत पुढे गेलेल्या कलाकारांपैकी त्या एक आहेत.
-
लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या निवेदिता यांनी १९८८ साली 'दे दणादण' या चित्रपटातून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं.
-
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवेदिता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे या सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं.
-
इतकंच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपट-मालिकांमधूनही काम केले आहे.
-
विशेष म्हणजे केवळ अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख नसून त्या एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे.
-
त्यांचा स्वत:चा एक साड्यांचा ब्रॅण्ड असून गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरु आहे.
-
कलाविश्वामध्ये कार्यरत असतानाच त्यांनी साड्यांचा एक ब्रॅण्ड सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करुन दाखवला.
-
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे.
-
निवेदिता सराफ यांनी प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांना अनिकेत नावाचा मुलगादेखील आहे.
-
अनिकेतच्या जन्मानंतर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी निवेदिता सराफ यांनी कलाविश्वातून थोड्या दूर गेल्या होत्या.
-
मात्र या कालावधीमध्ये त्यांनी त्यांचा 'हंसगामिनी' हा साड्यांचा ब्रॅण्ड सुरु केला.
-
स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वात प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख समजला जातो.
-
या ब्रॅण्डमधील अनेक साड्या त्या स्वत: डिझाइन करतात.
-
या ब्रॅण्डला अशोक सराफ यांनी नाव सुचवल्याचं सांगण्यात येतं.
-
सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी या साड्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं.
-
सध्याच्या घडीला साड्यांच्या किंमती प्रचंड असल्यामुळे अनेकांना डिझायनर्स साड्या विकत घेता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिझायनर साड्या उपलब्ध करुन देणे हा 'हंसगामिनी'चा उद्देश आहे.
-
तसंच या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ, हंसगामिनी / इन्स्टाग्राम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…