-
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.
-
माधुरीने आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
-
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर आहे.
-
बॉलिवूडची ही अभिनेत्री नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.
विशेष म्हणजे माधुरीला नृत्यात कोणीच मात देऊ शकत नाही. -
माधुरीच्या वयात वाढ होत असली तरी दिवसेंदिवस चिरतरुण दिसत आहे.
-
वाढत्या वयासोबतच माधुरीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून माधुरी बऱ्याच विविध ड्रेसमध्ये फोटोशूट करत आहे. त्यातील एक म्हणजे घागरा किंवा लेहंगा. -
माधुरीने गेल्या काही दिवसांपासून विविध रंगेबेरंगी लेहंगे परिधान करुन फोटोशूट केले आहे.
-
नुकतंच तिने निळ्या रंगाच्या एका लेहंग्यामध्ये फोटोशूट केले आहे. यात ती फार सुंदर दिसत आहे.
-
तिने परिधान केलेला हा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर अबू जाननी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे.
-
माधुरीने घातलेल्या या लेहंग्यावर भरजरी डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याकडे आकर्षित होत आहे.
-
विशेष म्हणजे त्यासोबत तिने निळ्या रंगाचे मॅचिंग इअररिंग घातले आहेत.
-
या लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
माधुरीने यापूर्वीही विविध लेहंग्यामध्ये फोटोशूट केले आहे.
-
माधुरीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली आहेत.
माधुरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. -
तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे
-
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य – माधुरी दीक्षित/ इन्स्टाग्राम)

Darsh Amavasya Horoscope: आज १२ पैकी कोणत्या राशींना लाभेल दुप्पट पुण्य तर कोणाला होईल लाभच लाभ; वाचा राशिभविष्य